१ मे ‘महाराष्ट्र दिन’: प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्र
१ मे, अर्थातच “महाराष्ट्र दिन” हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे.
या सुंदर दिवसाचे औचित्य साधून आम्ही एक प्रश्नमंजुषा तयार केली आहे. ‘महाराष्ट्र दिन’ व या दिनाशी संबंधित अनेक गोष्टींचा सखोल व सहजतेने उलगडा व्हावा हा या प्रश्नमंजुषा देण्यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल कि जे आपण डाउनलोड करू शकता.
चला तर मग “महाराष्ट्र दिन” प्रश्नमंजुषा सोडवूया…!!!
[ays_quiz id=”5″]
संगणक ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा व प्रमाणपत्र मिळवा….
Very informative quiz
Maharashtra din bhagyacha
Nice Quiz
Wonderful quiz
Happy Maharashtra din
Verry nice
Very nice important questions
Very informative quiz
Very important Questions
Very interesting
Good Information